Gunabai Gadekar

gunatai gadekar with meher baba

Meher baba visiting Gunabai Gadekar’s house


Gunabai Gadekar was a prominent social reformer and the wife of Ramchandra Gadekar, who was a follower of Meher Baba. Gunabai herself was actively involved in social reform movements, particularly focusing on women’s education and the upliftment of marginalized communities.

Early Life and Education

gunatai gadekarBorn in 1906 into a untouchable family, Gunabai faced societal challenges due to her ‘untouchable’ status. Despite these obstacles, she pursued education and became one of the first women from the depressed classes to receive formal education. She later became the first female headmaster from her community, advocating strongly for women’s education and the establishment of boarding facilities for female students.
WIKIPEDIA

Marriage and Activism

In 1930, Gunabai married Ramchandra Gadekar, aligning her personal life with her commitment to social reform. Under Dr. B.R. Ambedkar’s leadership, she played a significant role in the All India Depressed Classes Association, presiding over its women’s council sessions in 1930 and 1936. She also collaborated with organizations like the Harijan Sevak Sangh and contested elections as a member of the Indian National Congress in 1957, striving to effect change through political avenues.
WIKIPEDIA

Association with Meher Baba

Gunatai Gadekar with Meher Baba

Naggu and Khorshed Jessawala (left); Gunatai Gadekar (right), with Meher Baba

Ramchandra Gadekar’s father met Meher Baba and the entire family became devoted to Baba. Gunabai, had a close association with Meher Baba, who even attended their wedding in Ahmednagar.

For details about their association with Meher Baba Please visit the following link

https://trustmeher.org/meher-baba-close-disciples/men/gadekar-ramchandra-k

Literary Contributions and Legacy

Gunabai documented her experiences and insights in her memoir, Smritigandh (स्मृतिगंध), providing a valuable perspective on the social challenges and reforms of her era. She passed away in Mumbai at the age of 69, leaving behind a legacy of resilience and reform.
WIKIPEDIA

Meher Baba Blessed and fortunate souls
Meher Baba Blessed and fortunate souls

References:

गाडेकर , गुणाबाई रामचंद्र गाडेकर , गुणाबाई रामचंद्र : (१९०६ -१६ मे १९७५). गुणाबाई रामचंद्र गाडेकर एक जिद्दी व समाजसेवेला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व. अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजात त्यांचा जन्म झाला. अस्पृश्य चर्मकार समाजातील त्या पहिल्या शिकलेल्या महिला मुख्याध्यापिका होत. १९१८ ला दुसरी पास झाल्यानंतर वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी आनंदराव मारुतराव वाघमारे (दक्षिण आफ्रिका) यांच्याशी त्यांचा मुंबईत विवाह व याच वर्षी वैधव्य. त्यानंतर धारावी मुंबई येथे इयत्ता सहावीपर्यंतचे शिक्षण, त्यानंतर थर्ड इयर ट्रेड पर्यंतचे शिक्षण पुणे येथे पूर्ण. १९२६ साली सेवासदन सोडून पुण्यातील मंगळवार पेठेतील महारवाडा येथील शाळेत त्या रूजू झाल्या. पुण्यात चांभार विद्यार्थी मंडळाचे काम करत असताना बोर्डिंगला मदत गोळा करण्यासाठी विविध ठिकाणी जाऊन मदत गोळा केली.

या सेवेत असताना दत्तोबा पोवार, विनायक कर्नाटकी व इंदुमती राणीसाहेब यांच्याशी त्यांची ओळख झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस नागपूर येथे घेतलेल्या पहिल्या महिला परिषदेच्या (१९३०) अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळाला. याच वर्षी श्री रामचंद्र गाडेकर यांच्याशी पुनर्विवाह (१९३०). पुन्हा: अध्यक्षा महिला परिषद ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस नागपूर (१९३६). हरिजन सेवक संघाच्या सदस्य म्हणून त्यांनी सक्रीय कार्य केले. नाशिक येथील काँग्रेसच्या अधिवेशनात दलित परिषदेमध्ये मुलींच्या बोर्डिंग विषयीचा ठराव मांडला व संमत करून घेतला (१९५०). ‘ दलितांचा प्रश्न व स्त्रियांचे कर्तव्य ’ या विषयावर गुणाबाई गाडेकर यांनी पुणे केंद्रातून रेडिओवर भाषण गाजले. दलित वर्गातील विशेषतः त्यांच्या स्त्रियांतील अज्ञान व वेडगळ कल्पना घालविण्याची व त्यांच्यामध्ये विद्येचा प्रसार करण्याची खरी आणि भरीव कामगिरी स्त्रियाच करू शकतील, उच्च आचार व विचार यांची कल्पना त्या आपल्या नैसर्गिक प्रेमळपणामुळे या वर्गास सहज करून देतील, कुटुंबात स्त्री हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्या सुविद्य व सुगृहिणी झाल्या की कुटुंबे सुधारतील आणि म्हणून कुटुंबे सुधारली की दलित वर्ग हे नाव इतिहास जमा, किंबहुना नामशेषही होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्यास भारतात खरीखुरी लोकशाही नांदेल असा महत्त्वाचा विचार त्यांनी यामधून मांडला.

१९५७ साली पुण्याच्या हवेली विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसच्या उमेदवार होत्या. गुणाबाई गाडेकर यांनी १९५९ ते १९७४ या काळातील आठवणी स्मृतिगंध या आत्मचरित्रात समाविष्ट आहेत. आत्मचरित्रात गुणाबाईंच्या आयुष्यभराचे संघर्षमय जीवनानुभवावर समकालीन समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब आहे. चळवळीचा सामाजिक लेखाजोखा आणि समाजशास्त्रीय दस्तावेज म्हणून या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच सामाजिक इतिहासातील महत्त्वाचे संदर्भ या आत्मचरित्रात आहेत. गुणाबाई गाडेकर शिक्षण घेत असताना त्यांचा संबंध रमाबाई रानडे, बाबासाहेब देवधर, बापूसाहेब माटे यांच्याशी आला. अस्पृश्यता निवारणाची चळवळ चालवणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व त्यांच्या भगिनी जनाक्का शिंदे यांच्याशीही त्याचां संबंध आला. संत गाडगेबाबा व गुणाबाई गाडेकर यांचा कुटुंबाचा संबंध वरचेवर येत असे. सेवासदनमध्ये आलेल्या अनुभवांचे व समकालीन सामाजिक सुधारणेचे त्याच्या मर्यादांसह विस्तृत निवेदन या त्यांच्या आत्मचरित्रात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी चालवलेल्या चळवळीची माहिती या आत्मचरित्रात आहे.. गुणाबाई गाडेकर यांना आलेले जातिव्यवस्थेचे आलेले अनुभव हा या आत्मचरित्रातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. गुणाबाई गाडेकर यांच्या कुटुंबावर पारसी आधुनिक संत मेहेरबाबा यांचा प्रभाव होता. अशा या थोर समाजसेविका गुणाबाई गाडेकर यांचा मृत्यू वयाच्या ६९ व्या वर्षी मुंबई येथे झाला.

संदर्भ :

कोसारे, एच. एल., विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास, नेहा प्रकाशन, नागपूर, २०१२.
गाडेकर, गुणाबाई, स्मृतीगंध, मेहेरचंद्र प्रकाशन, पुणे, १९९२.
सावरकर, सुनीता, विसाव्या शतकातील अभिजनवादी स्त्री सुधारणा व डॉ बाबासाहेब आंबेडकर (गुणाबाई गाडेकर यांच्या आत्मचरित्राच्या आधारे चिकीत्सक परीक्षण), प्रशांत प्रकाशन, जळगाव, २०१९.

[Source]


गाडेकर , गुणाबाई रामचंद्र Gadekar, Gunabai Ramchandra: (1906 – May 16, 1975)Gunabai Ramchandra Gadekar was a determined individual dedicated to social service. Born into the so-called “untouchable” (cobbler) community, she was the first educated woman from her community to become a headmistress. In 1918, after passing the second grade at the age of just 12, she married Anandrao Marutrao Waghmare (of South Africa) in Mumbai. However, she was widowed the same year. She pursued her education up to the sixth grade in Dharavi, Mumbai, and later completed her Third Year Trade certification in Pune.

In 1926, she left Seva Sadan to join a school at Maharwada in Mangalwar Peth, Pune. While in Pune, she worked with the Chambhar Vidyarthi Mandal (Cobbler Student Association), raising funds for a boarding facility by traveling to various places.

During her service, she became acquainted with Dattoba Powar, Vinayak Karnataki, and Indumati Ranisahib. In 1930, Dr. Babasaheb Ambedkar honored her by appointing her as the president of the first women’s conference of the All India Depressed Classes held in Nagpur. That same year, she remarried Ramchandra Gadekar. She again served as president of the women’s conference of the All India Depressed Classes in Nagpur in 1936.

As a member of the Harijan Sevak Sangh, she actively contributed to social welfare. At the Nashik Congress Session, she presented a resolution about boarding facilities for Dalit girls, which was successfully passed in 1950. Gunabai Gadekar delivered a memorable radio address from the Pune center on the topic of “The Dalit Problem and Women’s Duty.”

Gunabai strongly believed that women were pivotal in eradicating ignorance and irrational beliefs among Dalits, especially Dalit women, and in spreading education among them. According to her, women’s natural compassion would help introduce the values of high morals and thoughts among the community. She emphasized that women are crucial components of families; once they become educated and capable homemakers, families will improve, leading to the progress of society. If such transformations occur, the term “Dalit” would disappear from history, ushering in true democracy in India.

In 1957, Gunabai contested the Assembly elections from the Haveli constituency in Pune as a Congress candidate. Her memoir, Smritigandh (Fragrance of Memories), encompasses her experiences between 1959 and 1974. The autobiography reflects her lifelong struggles and provides a mirror to the contemporary social structure. It serves as a valuable sociological document and a chronicle of social movements. The book contains important references to social history.

During her educational journey, she came into contact with notable figures like Ramabai Ranade, Babasaheb Devdhar, and Bapusaheb Mate. She also had associations with Maharshi Vitthal Ramji Shinde, a leader of the anti-untouchability movement, and his sister Janakka Shinde. Additionally, her family maintained close ties with Sant Gadge Baba. Her autobiography provides detailed accounts of her experiences at Seva Sadan and the limitations of contemporary social reform movements. It also sheds light on Dr. Babasaheb Ambedkar and the movements he led.

A particularly significant part of her autobiography discusses the caste-based discrimination she encountered throughout her life. Her family was also influenced by the modern Parsi saint Meher Baba.

This remarkable social reformer, Gunabai Gadekar, passed away at the age of 69 in Mumbai.

[Source – Translated into English from Marathi]

References:

Kosare, H. L., History of Dalit Movements in Vidarbha, Neha Prakashan, Nagpur, 2012.
Gadekar, Gunabai, Smritigandh, Meherchandra Prakashan, Pune, 1992.
Savarkar, Sunita, Elitist Women’s Reforms in the Twentieth Century and Dr. Babasaheb Ambedkar (A Critical Analysis Based on Gunabai Gadekar’s Autobiography), Prashant Prakashan, Jalgaon, 2019.


उपेक्षित गुणाबाई गाडेकर : पहिली दलित महिला आत्मकथाकार
{जन्म:१९०६, मृत्यु:१६ मे १९७५}

(By Prof. Hari Narke प्रा. हरी नरके)

“असे म्हणतात की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती!
चार भिंतींचे घर मी एकटी चालवते!”

कवि भिमराव गोपनारायण यांनी एका कर्तबगार महिलेचे मनोगत अवघ्या १३ शब्दात आपल्यासमोर चित्रशैलीतुन रेखाटले आहे.स्वता:च्या हिंमतीवर आकाश पेलावे तसे घर पेलणा-या कोट्यावधी स्त्रिया भारतात आहेत.बालपणात वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी वैधव्य वाट्याला आलेले असताना बाई खचुन गेल्या नाहीत.सेवासदनमध्ये त्यांनी उच्चशिक्षण घेतले.ट्रॆंड शिक्षिका आणि पुढे मुख्याध्यापिका बनल्या. पुनर्विवाह केला. नव-याला उच्च शिक्षणासाठी स्कोटलंडला पाठवले.राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाचे उपसंचालक म्हणुन त्यांनी काम केले.आपल्या पतीला बाईंनी फार मोठे अधिकारी म्हणुन नावारुपाला आणले. एम.एससी.ला विद्यापिठात पहिला क्रमांक मिळवणा-या मुलाला अमेरिकेतील केलीफोर्नियामधील बर्कले विद्यापिठात पाठवुन पीएच.डी.करायला लावली.त्याला जागतिक दर्जाचा जिआलाजिस्ट बनवले.पुढे हा मुलगा डा.बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठाचा कुलगुरु बनला.बाईंनी मुलीला डाक्टर करुन मेडिकल ओफिसर बनवले.बाई आयुष्यभर सामाजिक काम करीत राहिल्या.अश्या गुणवती परंतु तरिही संपुर्ण उपेक्षित महिलेला आज आपण भेटणार आहोत.

अस्पृश्य मानल्या गेलेल्या चर्मकार समाजात गुणाबाईंचा १०६ वर्षांपुर्वी {१९०६ साली}जन्म झाला.६९ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी डा.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील,गाडगेबाबा,महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, श्री.म.माटे,मेहरबाबा यांच्या सोबत कर्तबगारीच्या आणि मेहनतीच्या जोरावर फार मोठे क्षेत्र उभे केले.बाबासाहेबांनी भरवलेल्या महिला परिषदांची अध्यक्षपदे बाईंनी भुषवली.पुर्वास्पृष्य चर्मकार समाजाच्या विकासासाठी शिक्षणसंस्था,वसतीगृहे,उभारुन कामे केली.दुष्काळनिवारण,महिला जागृती,बचत योजना, दलित परिषदा, आल इंडीया डिप्रेस्ड क्लासेस लीग, जातीनिर्मुलन संस्था, महाराष्ट्र सामाजिक परिषद, हरिजन सेवक संघ, रिमांड होम,महिला मंडळ,कांग्रेस पक्ष, आदिंचे कार्य, महानगर पालिका, जिल्हा स्कूल बोर्ड, विधानसभा अश्या विविध निवडणुका लढवणे या नानाविध कामात बाई झिजत आणि झुंजत राहिल्या.बाई अतिशय जिद्दी होत्या.लढावुपणा हा त्यांचा स्वभाव होता.

आज सत्ताधारी पक्षाचे कोणतीही निवडणुक लढवणारे उमेदवार म्हटले की काय चित्र डोळ्यांपुढे येते? पक्षाचे तिकीट मिळण्यासाठी निवडणुकीत कोट्यावधी रुपये खर्च करण्याची क्षमता हा पहिला निकष असतो! बाई १९५७ साली पुण्याच्या हवेली विधानसभा मतदार संघातुन कांग्रेसच्या उमेदवार होत्या.त्यावेळचे एक चित्र त्यांच्याच शब्दात वाचुया.”हवेलीच्या ३ सीट होत्या.लोकसभेला काकासाहेब गाडगीळ आणि विधानसभेला मला आणि अण्णासाहेब मगर अश्या आम्हा दोघांना पक्षाने उमेदवारी दिली.ह्यांनी{बाईंचे पती रामचंद्र गाडेकर यांनी}लगेच प्रचारासाठी १ गाडी घेतली.निवडणुक प्रचार म्हणजे एक दिव्य आहे.मामासाहेब देवगिरीकर तेव्हा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समितीचे अध्यक्ष होते.त्यांनी एक पैसाही मला दिला नाही.काही व्यक्तींना खुपच मदत केली.एक हरीजन उमेदवार होते.त्यांनाही काही दिले नाही.ते प्रचाराला गेले असता सभेत भाषण करीत असताना मरण पावले.इतका ताण त्यांच्यावर पडला.मगरही पैसे मागु लागले.मग त्यांनाही एक हजार रुपये दिले.दोन गाड्या तुमच्या प्रचारासाठी पाहिजेत असे म्हटल्यानंतर पुन्हा ५० रुपये रोजाची एक गाडी भाड्याने घेतली.अश्या दोन गाड्या माझ्यातर्फे सकाळी ७ वाजताच तयार असायच्या.दहा पंधरा माणसांचे जेवण बरोबर घ्यावे लागे.डाळ,चुरमुरे यांच्या पिशव्या भरुन ठेवाव्या लागत.शिवाय कोठे होटेल लागले तर चहा ठरलेला असे.सबंध हवेली तालुका प्रचार केला.प्रत्येक खेड्यात जावुन सभा,भाषणे घेतली.बरोबर माणसेही खेड्यातील.मगर नेहमी बरोबर असायचे.त्यांची एक गाडी असायची.सर्व आटोपुन रात्री बारा एकला घरी परत येत असू.

..त्याच सुमारास मोरारजीभाईंचे द्वैभाषिक निघाले आणि कांग्रेसचे पुणे जिल्ह्याचे तात्यासाहेब जेधे सोडुन सर्व उमेदवार घरी बसले.आमचा खर्च फार झाला.पेट्रोलचे ३०००रुपये बिल झाले.इतर सर्व बिले द्यायची होती.आमचे शुक्रवार पेठेत एक घर होते.ते विकले.संगमवाडीला दोन प्लाट होते तेही विकले आणि सर्वांची बिले चुकती केली.मामा देवगिरीकरांनी एक पैसासुद्धा दिला नाही.आम्ही त्यांना भेटलो तर कानावर हात ठेवले.मनाचा घाव मनात ठेवुन पुन्हा नेटाने कामास लागले.”
या निवडणुकीतील बाईंचे सगळे अनुभव ही एक चित्रकथाच आहे.

आजवर अनेक दलित महिलांनी आत्मकथने लिहिलेली आहेत.बेबीताई कांबळे,शांताबाई कांबळे,कुमुद पावडे,उर्मिला पवार, सुनिता अरळीकर,मुक्ता सर्वगौड,मल्लिका अमरशेख,विमल मोरे, जनाबाई गि-हे यांची आत्मकथने गाजलेली आहेत.हे प्रत्येक पुस्तक म्हणजे जगण्याची विलक्षण धडपड टिपणा-या पराक्रमाच्या कहाण्या आहेत.गुणाबाईंनी आपले आत्मकथन लिहिले आहे.९ एप्रिल १९५९ ते १९७४ याकाळात त्यांनी लिहिलेल्या या सर्व आठवणी त्यांच्या मुलाने ग्रंथरुपाने प्रकाशित केलेल्या आहेत.”स्मृतिगंध” या त्यांच्या आत्मकथनाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची प्रस्तावना आहे.बड्योद्याला मुद्रीत केलेला हा ग्रंथ पुण्याच्या मेहेरचंद्र प्रकाशनाने १९९२ साली प्रकाशित केलेला आहे. आज या घटनेला २० वर्षे पुर्ण झालीत.दलित आत्मकथनांवर आणि त्यातही दलित महिलांच्या आत्मकथनांवर विपुल समिक्षा लेखन झालेले आहे.यातील अनेक पुस्तके अभ्यासक्रमाला लावण्यात आलेली आहेत.मात्र कोणाही विचारवंताने किंवा समिक्षकाने बाईंच्या या पहिल्या दलित महिला आत्मकथनाची अजिबात दखल घेतलेली नाही.दलित लेखिकांनीही या पुस्तकाकडे दुर्लक्ष करावे हे खेदजनक आहे.दलित चळवळीचा सामाजिक लेखाजोखा आणि समाजशास्त्रीय दस्तावेज म्हणुन या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्व आहे.पुण्याजवळच्या चोराची आळंदी या गावच्या रामजी बाबाजी ढवळे या आपल्या आजोबांच्या चटका लावणा-या आठवणींनी हे पुस्तक सुरु होते.१८९६ सालच्या प्लेगच्या साथीने माजवलेला हाहा:कार बाई मोजक्या शब्दात समर्थपणे चित्रित करतात आणि पुस्तक पकड घेत. आजोबांचे सगळे नातेवाईक या प्लेगमध्ये मरण पावतात. बाईंचे वडील, बाई आणि नातेवाईक यांना अस्पृश्यतेचे अनेक चटके सोसावे लागतात. तरिही बाईंच्या लेखनात कटुता नाही की या अनुभवांचे भांडवल करुन सहानुभुती मिळवण्याची धडपड नाही. बाईंचा वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी आफ्रिकेतील मोठ्या श्रीमंत घरातील मुलाशी बालविवाह होतो. पण लगेच आलेल्या वैधव्यापुढे बाई झुकत नाहीत. खंबीरपणे कंबर कसुन उभ्या राहतात. न्या. म.गो.रानडे यांच्या पत्नीने सुरु केलेल्या सेवासदनात जिद्दिने उच्च शिक्षण घेतात. बाई बुद्धीमान,कर्तबगार आणि देखण्या असल्याने अनेक ब्राह्मण घरातील स्थळे चालुन आलेली असतानाही त्या विचारपुर्वक समाजातीलच एका होतकरु तरुणाशी पुनर्विवाह करतात.त्याचे फाटके घर स्वता:च्या पदराने सजवतात.उभे करतात.महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, देवधर, महात्मा गांधी यांच्या विचारातुन बाईंना उर्जा मिळते. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत बाई अनेक महिला परिषदांचे अध्यक्षस्थान भुषवतात. बाबासाहेबांचे १९५० च्या दशकातील निवडणुकीतील विरोधक सदोबा काजरोळकर यांच्यासमवेतही त्यांनी कार्य केले.बाबासाहेबांना राजर्षि शाहुंची भेट घडवणारे कोल्हापुरचे दत्तोबा पवार तसेच बाबासाहेबांचे सहकारी राजभोज यांच्याशी गाडेकर घराण्याचे घनिष्ट संबंध होते.चर्मकार समाजातील पहिल्या उच्चशिक्षित महिलेचा जीवनसंघर्ष टिपणारे हे आत्मकथन मराठी साहित्यातील महत्वाचे पुस्तक आहे.बाईंनी पतीनिधनापर्यंतचाच प्रवास या पुस्तकात सांगितलेला आहे. खरे तर पतीच्या मृत्युनंतरही बाईंनी मुलामुलीला शिकवले.मोठे केले.बाई समाज कल्याण मंडळ, जिल्हा शिक्षण लोकल बोर्ड यावर सदस्य म्हणुन काम करीत.बाई अत्यंत शुर होत्या. पंढरपुरला एका चोराचा पाठलाग करुन त्यांनी दिलेली झुंज बघुन पोलीस अधिकारीही चकीत झाले होते.

१६४ पृष्ठांच्या या पुस्तकाची किंमत अवघी ६० रुपये आहे. ८८५/५, भांडारकर इन्स्टिट्युट रोड, डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४ या पत्त्यावर या पुस्तकाबाबत अधिक चौकशी करता येईल.माझे मित्र आणि बाईंचे नातु मेहर गाडेकर यांच्यामुळे मला हे पुस्तक उपलब्ध झाले.

पुस्तकातील काही भाग अगदी धावता आहे. घटनांची जंत्री देणारा आहे. स्मरणाच्या आधारे केलेले हे लेखण असल्याने काही विसंगतीही राहुन गेलेल्या आहेत.बाई कसलेल्या लेखिका नसल्याने पुस्तकावरुन जाणकार समिक्षकाचा हात फिरण्याची गरज होती.तसे झाले असते तर एक अव्वल दर्जाचे मराठी आत्मकथन म्हणुन या पुस्तकाची गणना करावी लागली असती.तरिही जे आहे ते लक्षनीय आहे.या पुस्तकात गुणवती गुणाबाई गाडेकरांचे आकाशवाणीवरील एक भाषण देण्यात आलेले आहे. त्यात त्या म्हणतात “दलित वर्गातील विशेषत: स्त्रियातील अज्ञान व वेडगळ कल्पना घालविण्याची व त्यांच्यामध्ये विद्येचा प्रसार करण्याची खरी आणि भरिव कामगिरी स्त्रियाच करु शकतील.उच्च आचार व विचार यांची कल्पना त्या आपल्या नैसर्गिक प्रेमळपणामुळे या वर्गास सहज करुन देतील.कुटुंबात स्त्री हा महत्वाचा घटक आहे.त्या सुविद्य व सुगृहीणी झाल्या की कुटुंबे सुधारतील आणि दलितवर्गाची सुधारणा होवुन “दलित” हा शब्दच ईतिहासजमा होवुन नामशेष होईल.भारतात खरीखुरी लोकशाही, समतेचे राज्य आणि स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी महिलांनी नेटाने प्रयत्न करायला हवेत.”

[Source]